• Sun. Sep 6th, 2026
राजीनामा गेला खड्ड्यात धनंजय मुंडे यांना बडतर्फ करा, अंजली दमानिया भावूक

Anjali Damania On Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल संवेदना व्यक्त केल्या असून, धनंजय मुंडे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया आक्रमक

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे (Sanotsh Deshmukh Murder Photos) काही फोटो हे पुढे आले, ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अंगावर काटा आणणारी ही फोटो नक्कीच आहेत. आरोपी देशमुखांना कशाप्रकारे मारहाण करत होते आणि हसत होते हे स्पष्ट दिसतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) एक आरोपी अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येची फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देवगिरी बंगला गाठला. यावेळी अजित पवार (Ajit Pawar), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा (Devendra Fadanvis Orders Dhananjay Munde For Resignation) देण्यास सांगितले आहे.

आता याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या दिसल्या आहेत. अंजली दमानिया म्हणाल्या की, संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो बघितल्यानंतर रात्री मला झोप लागली नाहीये. धनंजय देशमुखने मला रात्री अडीच वाजता मेसेज केला. ताई मला हे बघवत नाहीये आणि मी काहीतरी निर्णय घेणार आहे. मला काय बोलावे हेच सुचत नाहीये. मी त्याला सकाळी फोन करून काही करू नको फक्त शांत रहा सांगितले. हे सर्व सांगताना अंजली दमानिया या रडताना देखील दिसल्या.
Dhananjay Munde Resignation : राजकीय घडामोडींना वेग, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात बैठक, धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव?मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना बडतर्फ का नाही करू शकत? असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. शासनाला अजूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वाट बघायची आहे. मला कंटाळा आलाय या राजकारणाचा. भावना, संवेदना सर्व संपल्या आहेत, या राजकारण्यांच्या. त्या थर्डक्लास कराडला अजूनही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांना का सांगता येत नाही, हा मंत्री मला नको म्हणून, असाही प्रश्न यावेळी अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

अंजली दमानिया यांनी पुढे म्हटले की, राजीनामा गेला खड्ड्यात धनंजय मुंडे यांना बडतर्फ करा. सर्वजण सांगत आहेत, सर्व पुरावे दिली आहेत. तरीही तुम्हाला राजीनामा घेणे शक्य होत नाहीये. बस झाले तुमचे राजकारण असेच थेट म्हणताना अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे आज राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचा राजीनामा मागितला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed