• Mon. Sep 14th, 2026
Jalgaon News : तुरुंगातून सुटला पण वाटेत तीन जणांनी घेरले, जीवघेणा वार केला अन्…; घटनेने जळगाव हादरले

Jalgaon Crime News : जळगावमधून खळबळजनक घटना समोर येत आहे. येथील एका तुरुंगातून चार वर्षानंतर जामीनावर सुटका झालेला तरुण भावासोबत दुचाकी वर जात असताना त्याच्यावर तीन जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

Lipi

निलेश पाटील, जळगाव : जळगावमधून खळबळजनक घटना समोर येत आहे. येथील एका तुरुंगातून चार वर्षानंतर जामीनावर सुटका झालेला तरुण भावासोबत दुचाकी वर जात असताना त्याच्यावर तीन जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये २९ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

कोरोनाकाळात झालेल्या खुनाच्या गुन्ह्मात तरुण गेल्या चार वर्षापासून शिक्षा भोगत आहे. त्याची आज सुटका झाल्यानंतर वाटेत टपून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी धारदार शास्त्राने वार केले आहेत. मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले असून जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
जन्मदात्या आईनेच मुलींना विकलं, 10 हजारात गैरकृत्यांच्या खाणीत ढकललं, ऑर्केस्ट्रावर धाड आणि….
प्रतीक हरिदास निंबाळकर (वय 29, राहणारजुना कानळ्दा रोड, सिटी कॉलनी, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सन २०२० मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात प्रतीक गेल्या चार वर्षापासून कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. दरम्यान, न्यायालयाच्या अटी शतीवर प्रतीक निंबाळकर याचा आज जामीन मंजूर करण्यात आला होता. संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी ७ वाजता प्रतीक निंबाळकर हा त्याचा भाऊ वैभव निंबाळकर यांच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, शाहूनगर येथील धरम हॉटेल जवळून जात असताना यावेळी टपून बसलेले तीन हल्लेखोर यांनी धारदार शास्त्राने प्रतिकवर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed