लाडकी बहीण योजनेतून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणार्या कुटुंबातील महिलांना आता वगळले जाणार आहे. यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ शकते. सरकारकडून यासाठी आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे. सरकारवर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केलीये.
मध्यंतरी चर्चा होती की, लाडकी बहीण योजना आता बंद होणार. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी ठणकावून सांगितले होते की, ही योजना बंद होणार नाहीये. आता लाडक्या बहिणींचे उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत सरकार घेणार असल्याचे कळताच अनेकांनी यावर टीका केलीये. निवडणुकीच्या अगोदर काही गोष्टींची पडताळणी न करताच महिलांना पैसे देण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये.
लाडक्या बहिणींना धक्का देणारी बातमी, राज्य सरकारचं मोठं पाऊल, निकषांत न बसणाऱ्या…जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता जर त्यांची नावं कापणार असतील तर मत घेऊन हे करत आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितले की, तुम्ही लाच घेण्याचाच प्रकार करत आहात. जर नावं कापली जाणार असतील तर त्यावर शिक्कामोर्तब होईल की, मतांसाठी लाच दिली. मते घेतली, सरकार आले, सत्ता आली. आता महिलांना घरी पाठवा. पण आम्ही सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू. केबिनमध्ये आम्ही महिलांना बसू.
मंत्र्यांचे जीने मुस्कील करू. अशा पद्धतीने तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार. पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, म्हणजे तुम्ही आमच्या महिला बघिनींना फसवले खोटी आश्वासने देऊन. आता पळ कशाला काढत आहात. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यामधील सर्वात महत्वाची अट म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. मात्र, अनेक महिलांनी उत्पन्नाच्या अटीमध्ये बसत नसताना देखील अर्ज केली होती.

