नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह, तसेच आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. कपिल सिब्बल यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत. विधीमंडळ सदस्यांच्या संख्येंवरुन राजकीय पक्षावर कारवाई करता येऊ शकत नाही, असा महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
संबंधित युक्तिवाद करत असतानाच त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. सिब्बल यांनी सर्व घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. यानंतर आजची सुनावणी संपली. आता या प्रकरणावर उद्या पुन्हा दुपारी दोन वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल.
कपिल सिब्बल यांनी काय-काय युक्तिवाद केला?
पक्षाच्या घटनेनुसार पदे निर्माण केली होती. पण ती केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्षात घेतली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली. ठाकरेंनी पक्ष घटनेनुसार उपनेत्याची नियुक्ती केली. तसेच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती देण्यात आलेली, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. यावेळी कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा उल्लेख केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सुनील प्रभू आणि एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून निवड केली होती. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यांनी नियुक्त्या केल्या होत्या. तसेच निवडणूक आयोगात पक्षाच्या सर्व गोष्टी कायदेशीर सादर केल्या होत्या. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2019 मध्ये सरकार आलं तेव्हा सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. तर एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही नियुक्त्यांवर उद्धव ठाकरे यांच्या सह्या होत्या. पण महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर पक्षाच्या आमदारांनी क्रॉस मतदान केलं आणि सर्व आमदार सुरतला गेले. सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले. हा काही योगायोग नाही. हा नियोजित दौरा होता, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
पक्षाचा व्हिप आमदारांनी पाळला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. पण त्याआधी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी दिली होती हे कोर्टाने लक्षात घ्यावं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केली.
आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ नेता म्हणून दूर केलं आणि अजय चौधरी यांची नियुक्ती केली. सुनील प्रभू यांनी 21 जून रोजी व्हीप जारी करुन पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्याचं निमंत्रण सगळ्या आमदारांना दिलं गेलं होतं, असं कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं.
विधीमंडळात कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे आहे. 2019 च्या मंत्रिमंडात एकनाथ शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. या काळात शिंदेंनी पक्षाच्या घटनेवर आक्षेप घेतला नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
आमदार सुरतला गेले तेव्हा पक्षाकडून प्रतोद, गटनेते पद बदलण्यात आले होते. याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना माहिती देण्यात आली होती. उपाध्यक्षांनी शिवसेनेने सांगितलेले बदल मान्य केले होते. उपाध्यक्षांनी गटनेतेपदाचा बदल रेकॉर्डवरही घेतला होता. दुसरीकडे भरत गोगावले यांना एकनाथ शिंदेंनी आपल्या गटाचं प्रतोद केलं हा निर्णय राज्याबाहेर घेतला गेला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
‘गटनेता हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना’
कपिल सिब्बल यांना यावेळी कोर्टाने महत्त्वाचा प्रश्न विचारला. विधीमंडळ गटनेता हटवत असताना सदस्यांच्या सह्या घेतल्या होत्या का? असा प्रश्न कोर्टाने दिला. त्यावर कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या घटनेनुसार, विधीमंडळ गटनेता हटवण्यासाठी सदस्यांच्या सह्या नसल्या तरी पक्षप्रमुखाला तो अधिकार आहे, असा युक्तिवात कपिल सिब्बल यांनी केला.
राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली होती. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टाने ताशेरे ओढळे होते, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
ज्यावेळेला आमदार गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांची संख्या 31 होती. पण ज्यावेळेस त्यांना कळालं की आपली संख्या 39 होत आहोत आणि आपण सरकार बनवण्याच्या स्थितीत आहोत. त्यानंतर सगळ्यांनी हा प्रकार केला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
कपिल सिब्बल यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. धनंजय चंद्रचूड म्हणाले होते की, राजकीय आणि विधीमंडळ पक्ष एकत्र करता येत नाही. मात्र नवीन निवडणूक येईपर्यंत अपात्रेतेबाबत निर्णय न घेणं हे लोकशाहीसाठी घातक नाही का? असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या आमदारांसह राज्यपालांची भेट घेऊन सरकार बनवलं. राज्यपालांनी त्यांना बहुमत चाचणी घ्यायला सांगितली होती, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
लोकशाहीवर घाला घालणाऱ्या गोष्टी घडल्याचा युक्तिवाद
पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधीमंडळ पक्ष हा मोठा नाही. संसदीय लोकशाहीत व्हीपला महत्त्व आहे. व्हीप नाकारल्यास कारवाई होते. पण घडलेल्या सर्व गोष्टी या लोकशाहीवर घाला घालणाऱ्या आहेत. 10 व्या सुचीनुसार होणाऱ्या गोष्टी इथे घडल्या नाहीत, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
विधीमंडळ पक्षाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देणं अतिशय चुकीचं आहे. पक्षाच्या आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केले आहे. या सर्व आमदारांवर दहाव्या शेड्यूलनुसार कारवाई केली पाहिजे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यानंतर आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार होते. पण त्यांनी तसं न करता सुनील प्रभू यांची प्रवक्ते पदी केलेली नियु्क्ती रद्द केली. त्याचबरोबर अजय चौधरी यांचीदेखील गटनेतेपदाची निवड रद्द केली, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
विधीमंडळ सदस्यांच्या संख्येवरुन राजकीय पक्षावर कारवाई करता येत नाही. विधीमंडळ सदस्य संख्येच्या आधारावर पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं, असादेखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा