• Wed. Aug 5th, 2026

    Crime News: तरुणी अचानक घरातून गायब; झोमॅटो डिलिव्हरीच्या धाग्याने उलगडले रहस्य; दरवाजा तोडताच पोलिसांसह कुटुंबाला धक्का

    Crime News: तरुणी अचानक घरातून गायब; झोमॅटो डिलिव्हरीच्या धाग्याने उलगडले रहस्य; दरवाजा तोडताच पोलिसांसह कुटुंबाला धक्का

    नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या पोलिसांच्या तपासाला अखेर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यामुळे यश आले. मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलगी आणि आरोपी दिघोरी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. याचदरम्यान एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या चौकशीतून संबंधित भाड्याच्या खोलीचा पत्ता मिळाला आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या अल्पवयीन मुलीला बाहेर काढून तिला तत्काळ रुग्णालय दाखल करण्यात आले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी मध्यरात्री हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून विशेष पथके तयार केली. तपासादरम्यान मुलीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून तिचे शेवटचे लोकेशन दिघोरी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस पथकाने संपूर्ण परिसरात शोध सुरू केला. तपासादरम्यान एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडे संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. तो एका घरी फूड डिलिव्हरी द्यायला जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच संबंधित मोबाईल क्रमांक आणि घराचा अचूक पत्ता उपलब्ध करून दिला.

    माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र घराचे दार आतून बंद होते. त्यानंतर सापळा रचून घराचा मागचा दार तोडून घरात प्रवेश केला. आत प्रवेश करताच मुलगी गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिच्या हातावर चाकूच्या खोल जखमा होत्या, तर शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा दिसून आल्या.

    प्राथमिक तपासात आरोपीने गेल्या काही तासांपासून तिला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले. पोलिसांनी विलंब न करता मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या निर्भय उर्फ आकाश पाखरे (वय १९, रा. ठाणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्राथमिक तपासानुसार, आरोपी आणि पीडित मुलीची सोशल मीडियावरून ओळख झाली होती. आरोपीने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्याशी संपर्क साधून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर ब्लॅकमेल करत नागपुरात बोलावल्याचे समोर आले आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed