• Mon. Sep 7th, 2026
देशमुख प्रकरणात ट्विस्ट! धस-मुंडे भेटीचं गुपित अखेर उघड, बावनकुळेंनी सांगितलं कारण

Chandrashekhar Bawankule on Dhas-Munde Meet : राजकीय वर्तुळात सध्या धस-मुंडे भेट चर्चेचा विषय ठरला आहे. चार दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचा दावा केला जात आहे. यातच चंद्रशेखर बावनकुळेंनी या भेटीबद्दल गौप्यस्फोट केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या धस-मुंडे भेट चर्चेचा विषय ठरला आहे. चार दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचा दावा केला जात आहे. यानंतर धस यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. धसांनी मुंडेंची भेट घेण्याचं नेमकं कारण काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. यातच चंद्रशेखर बावनकुळेंनी गौप्यस्फोट केला आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची माझ्यासमोरच त्यांच्यात चर्चा झाल्याचे बावनकुळेंनी स्पष्ट केले आहे. बावनकुळेंनी धस-मुंडे भेटीबद्दल जाहीर वाच्यता केल्याने राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

‘दोघांनी योग्य भूमिका मांडली’

सुरेश धस आणि मुंडे यांच्यात माझ्यासमोरच चर्चा झाली आहे. काही लपून -छपून चर्चा झाली नाही. त्यांच्या निवासस्थानी आम्ही साडेचार तास एकत्र होतो, यावेळी त्यांच्यातील मतभेदावर चर्चा झाली. या चर्चेमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी दोघांचीही मागणी होती. त्यांच्यामध्ये मनभेद नाही, मतभेद आहेत. महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही, सुख दु:खात असे होत नाही. माझ्यासमोर कुठलीही क्रॉप्रोमाईजची भूमिका घेतली नाही. दोघांनी योग्य भूमिका मांडली आहे. या भेटीला २७ ते २८ दिवस झाले आहेत, असे बावनकुळेंनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान सुरेश धसांवर मात्र चौफेर टीका केली जात आहे. ‘धस-मुंडे-कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्देवाने हे सत्य होताना दिसतंय,’ अशी खोचक टीका खासदार संजय राऊतांनी केली. तर जरांगेंनीही धसांवर टीकास्त्र डागले. ‘मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता, तुम्ही गद्दारांच्या यादीत जाऊन बसलात.’ अशी संतप्त प्रतिक्रिया जरांगेंनी दिली.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed