Arvind Sawant On Eknath Shinde : अरविंद सावंत यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलीये. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, यावरही बोलताना अरविंद सावंत दिसले. आदित्य ठाकरे यांच्या दिल्ली दाैऱ्याबद्दलही बोलताना अरविंद सावंत दिसले आहेत.
अरविंद सावंत एकनाथ शिंदेंवर टीका करताना म्हणाले की, शिवसेना संघटना ही दिलेला शब्द पाळणारी आणि दिलेले नाते जपणारी संघटना आहे. कधी कधी हे नाते जपण्यात संघटनेचा तोटा जरी झाला पण नाते तुटणार नाही. नेता म्हणजे गड नव्हे शिवसेना म्हणजे गड आहे. जे गेले ते गेले जे आहेत त्यांना सोबत घेऊन संघटना पुढे वाढवायची असेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
पक्षप्रवेश सोडून एकनाथ शिंदे दालनात, प्रकरण नेमकं काय?, वाचाहे गद्दारी लोक आहेत. अगोदर गुजरातला गेले त्यानंतर आसामला गेले. एकनाथ शिंदे पळकुटे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना अरविंद सावंतांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवार यांनी केला, यामुळे आमच्या मनाला ठेच पोहोचली. कारण हे पळकूटे आहेत. आदित्य ठाकरे हे दिल्लीला राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी आले होते. नुकताच झालेल्या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये म्हणावे तसे यश आपला मिळाले नाही.
उगवत्या सुर्याला तर सर्वचजण नमस्कार करतात. मात्र, आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मिलिंद देवराबद्दल बोलताना अरविंद सावंत म्हणाले, त्यांना त्यांच्या स्वत:च्या मतदार संघात दोनदा पराभूत व्हावे लागले. तिसऱ्यांदा पण पराभूत झाले असते, त्यांना उभा राहण्याचे धाडस झाले नाही. एका पदासाठी विकली गेलेली ही माणस त्यांना निती आहे का? असे म्हणताना अरविंद सावंत हे दिसले आहेत.

