• Thu. Mar 12th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    स्नेहल जगताप यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्पष्ट संकेत, मंत्री भरत गोगावले यांचे मोठे विधान

    ठाकरे गटाच्या रायगड जिल्ह्यात महाडच्या माजी नगराध्यक्ष व गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप या महायुतीत जातील अशी चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. पोलादपूर येथे क्षत्रिय मराठा पतसंस्थेच्या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्पष्ट संकेत देत मोठ विधान केलं. ‘विधानसभा मतमोजणीच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या ताई आज व्यासपिठावर आहेत याचा आनंद असून त्यांना तुम्ही घेतले काय किंवा त्या आमच्याकडे आल्या काय,एकच महायुती आहे. त्यांना कोणाकडे जायचे आहे त्यांनी ठरवावे’

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *