प्रहार दिव्यांग सेलच्या वतीने संभाजीनगर शहरातील शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढून पिंडदान आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे मोर्चात सहभागी झाले होते. कन्नड येथील एका दिव्यांग व्यक्तीने 27 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती, त्यांच्या तेराव्या निमित्त यावेळी पिंडदान आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झालीय. कर्जमाफीसारख्या मागण्यांसाठी आज हे पिंडदान आंदोलन केल्याचं बच्चू कडू म्हणाले. तर यापुढे रायगडावर उपोषण करणार असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलं.