Mumbai Drug Trafficking : मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या मुंबई झोनल युनिटने ड्रग्स तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एनसीबीने २०० करोड पेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एनसीबीच्या तपासात असे दिसून आले की, हे ड्रग्ज सिंडिकेट परदेशातील एका टोळीकडून चालवले जात होते. जप्त केलेल्या ड्रग्जपैकी काही ड्रग्ज अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आले होते आणि ते कुरिअर सेवांद्वारे भारत आणि इतर देशांमध्ये पाठवले जात होते. या प्रकरणात मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीवर छापा टाकून काही ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याचे पार्सल ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते.
रिसॉर्टच्या रुममध्ये शिरला, ओढत नेऊन गाडीत ढकललं आणि… पुण्यातील महिलेसोबत थरकाप उडवणारा प्रकार
एनसीबीने ४ जणांना ठोकल्या बेड्या
एनसीबीने या ड्रग्ज तस्करीत सहभागी असलेल्या ४ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवतात त्यांनी कबुली दिली की, हे सिंडिकेट एक संघटित नेटवर्क म्हणून काम करत होते. ज्याअंतर्गत लोक एकमेकांसाठी टोपणनाव वापरत होते आणि अज्ञातपणे ड्रग्ज तस्करीच्या योजनांवर चर्चा करत होते. यावर एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रग्जमुक्त भारताच्या स्वप्नाच्या अनुषंगाने आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.
एनसीबी आता ड्रग्ज सिंडिकेट नेटवर्कच्या खोलवर जाऊन तपास करत आहे आणि त्यामागे आणखी कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच, ड्रग्ज तस्करीच्या मुळाशी आणखी कोण कोण आहेत, याचा सखोल तपास करत आहेत. ही कारवाई केवळ मुंबईतच नव्हे तर भारतातील इतर भागातीलही ड्रग्ज तस्करीविरुद्धचे मोठे यश आहे आणि एनसीबी टीमने असेही संकेत दिले आहेत की, ड्रग्ज तस्करांवरील कारवाईचा बडगा असाच सुरु राहील.

