• Tue. Sep 22nd, 2026

MLA Ravindra Chavan Birthday : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. डोंबिवलीतील अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाला भेट देत त्यांनी तेथील नागरिकांसोबत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.

रविंद्र चव्हाण वाढदिवस सेलिब्रेशन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्यक्ष भेटीगाठी, दूरध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

स्नेहसंमेलनात भगिनींकडून औक्षण

डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थान येथे दर्शन घेऊन रविंद्र चव्हाण यांनी वाढदिवसाची सुरुवात केली. त्यानंतर ‘जननी आशिष’ अनाथाश्रम, ‘आपलं घर’ वृद्धाश्रम यांसह ‘डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी’ या संस्थांना सहकुटुंब भेट देत तेथील नागरिक आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला. ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’च्या स्नेहसंमेलनात भगिनींकडून औक्षण करण्यात आले आणि नागरिकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.

Maharashtra TimesPandharpur News : उतारवयात प्रेम जडलं, वृद्धेने वादातून प्रियकराला संपवलं, दीड महिन्यांनी घटनेचा उलगडा

अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार

मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयांमध्ये अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी रविंद्र चव्हाण यांचे औक्षण केले, तसेच भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवलीतील विविध भाजप कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी Gen Z युवकांनी गुलाबपुष्प देत त्यांचे अभीष्टचिंतन केले.

तरुणांना ड्रायव्हिंग लायसन्स

रविंद्र चव्हाण यांच्या दीर्घायुष्यासाठी आयोजित होमहवनासारख्या धार्मिक विधींसोबतच राज्यभरात विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायकलींचे वाटप, अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सोलार पॅनेल, तरुणांना ड्रायव्हिंग लायसन्स व सुरक्षिततेसाठी हेल्मेट, तसेच वयोवृद्धांना ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप करण्यात आले. याशिवाय सामाजिक आरोग्याची बांधिलकी जपत राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले, तर वृद्धाश्रमांमध्ये वॉशिंग मशिन आणि आवश्यक साहित्याची मदत सुपूर्द करण्यात आली.

Maharashtra TimesRain Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना होणार फायदा; परवापासून मुसळधार बरसण्याची शक्यता

प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या

कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक, भाजप परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिकांनी रविंद्र चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी, युवा सहभाग आणि ज्येष्ठांचा सन्मान यांचा सुरेख संगम साधत रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकी ही जनसेवेच्या कार्यासाठी आणखी बळ देणारी असल्याची प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा