एसटी दरवाढीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल त्यांनी केला. निर्णय अंगलट आले की नाही म्हणायचं आणि चांगलं झाल्यास श्रेय घ्यायचं, असा हल्लाबोल त्यांनी केला. श्रेय घेण्यासाठी पुढे यायचं अशी महायुतीच्या मंत्र्यांची पद्धत असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.