पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. कमला नेहरू रुग्णालयात 50 बेड आणि 15 आयसीयू आता राखी ठेवण्यात आली आहेत. यासोबतच आता मोफत उपचार देखील दिले जाणार आहेत. महापालिकेचे आयुक्त आता यासंदर्भात बैठक देखील घेणार आहेत.
पुण्यात इलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णात वाढ
पुण्यात 74 रुग्ण हे जीबीएस आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर पाच रुग्णांना आज डिस्चार्ज होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जीबीएसच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. 50 बेड तर 15 आयसीयू कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. प्रशासन या रोगाच्या विरोधात लढण्यास सज्ज झाल्याचेही बघायला मिळतंय.
‘जीबीएस’च्या रुग्णांना मोठा दिलासा; सरकारी योजनांतून २ लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफतमहापालिका आयुक्त घेणार बैठक
याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची थोडा वेळात बैठक देखील घेणार आहेत. ज्या खाजगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ या रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णावर सध्या उपचार सुरू आहे. तिथे आता महापालिकेचे अधिकारी असणार आहेत.
खासगी रुग्णालय महापालिकेचे अधिकारी
खासगी रुग्णालय रुग्णाकडून किती बिल घेतात, यावर महापालिकेचे अधिकारी हे लक्ष ठेवणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे. खासगी रुग्णालय रुग्णांकडून तीन ते पाच लाखांपर्यंत उपचारासाठी पैसे घेत असल्याचेही सांगितले जातंय. यामुळेच पालिकेचे अधिकारी आता खासगी रुग्णालयात असणार आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचाराची रक्कम वाढविण्यात आली आहे.