Produced byविश्रांती शिंदे | Contributed byप्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम24 Jan 2025, 9:09 pm
नुकताच बहुप्रतिक्षित चित्रपट ‘छावा’चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होऊन २४ तास होत नाहीत, तोच त्याला विरोध सुरू झाला आहे.दरम्यान, यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारलेले…अभिनेते अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, फक्त ट्रेलर पाहून नेमकं चित्रपटात काय आहे याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे मला वाटतं ट्रेलरमधील दृश्यात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी…येसूबाईसाहेब या लेझीम खेळताना दिसतात. हा शेवटी आपला एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे.