वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ४८ वी वार्षिक सर्व साधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले.सुरुवातीला अजित पवार आणि शरद पवार बाजूला बसणार होते मात्र अजित दादांनी आसनव्यवस्था बदलली.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना शरद पवारांशी बोलायचं असल्यानं जागा बदलल्याचं अजित पवारांनी सांगितलं.