• Thu. Jan 23rd, 2025

    भाजपकडून सांगलीतील नेत्यांची हकालपट्टी; कारवाई मागे गोपीचंद पडळकर असल्याचा आरोप

    भाजपकडून सांगलीतील नेत्यांची हकालपट्टी; कारवाई मागे गोपीचंद पडळकर असल्याचा आरोप

    सांगलीतील भाजप नेत्यांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. त्यांनी यामागे आमदार गोपीचंद पडळकर असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सांगली: विधानसभा निवडणूकीत पक्ष विरोधी भूमिका घेतल्यावरून सांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवीपाटील यांची भाजपाने पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलय,मात्र यावरून माजी सभापती व भाजपचे नेते तमनगौडा रवीपाटील यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपला खडे बोल सुनावले आहेत, जत तालुक्यामध्ये भाजपा पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे,का ? असा सवाल तमनगौडा रवीपाटील यांनी केला आहे.

    त्याचबरोबर भाजप सचिवाकडून करण्यात आलेल्या कारवाईला आपण जुमानत नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील निर्णय कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन,होईल असे ही तमानगौडा रवीपाटील यांनी स्पष्ट केलाय.

    जत विधानसभा निवडणुकीमध्ये माझी सभापती तमन्ना रवी पाटील यांनी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवली होती तर चव्हाण गावडे रवी पाटील यांच्याबरोबर माजी आमदार विलासराव जगताप यांनी देखील पक्षाच्या विरोधात भूमिका घेत तमानगौडा रवी पाटील यांना पाठिंबा देत प्रचार केला होता. जत विधानसभा मतदारसंघातून भाजपाने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिलेली होती मात्र तरी देखील रवी पाटील यांनी निवडणूक लढवली यामध्ये पडळकर विजय झाले होते.पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत भाजपाने माजी आमदार विलासराव जगताप आणि विधानसभा निवडणूक लढवणारे बंडखोर उमेदवार माजी सभापती तमन्गौडा रवीपाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, भाजपचे प्रदेश सचिव धनंजय कुलकर्णी यांनी ही कारवाई केली आहे.

    माजी सभापती आणि विधानसभा निवडणूक लढवणारे बंडखोर उमेदवार तमनगौडा रवीपाटील यांनी संताप व्यक्त केलाय, भूमिपुत्राच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवली होती. निवडणूक लढवताना पक्ष सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा आपण राजीनामा दिला होता. आणि आता तीन महिन्यानंतर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये हेतू काय असा सवाल तमनगौडा रवीपाटील यांनी केला आहे .

    कारवाई बाबत तमनगौडा रवीपाटील म्हणाले,जत तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षात आपण भाजप पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवला,पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा निधी न घेता पक्षाचा संघटन केलं, प्रवाहात नसणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना भाजप पक्षाशी जोडलं. महाराष्ट्रातील भाजपाची पहिली डिजिटल वॉर रूम जत तालुक्यात आपण सुरू केली. इतकच नव्हे तर नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यात भाजपचे उमेदवार असणारे माजी खासदार संजय काका पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य जत तालुक्यातून मिळालं हे या तालुक्यांमध्ये आपण पक्ष संघटन आणि पक्षाची मजबूत बांधणी केल्याचा परिणाम होता,मग पक्षासाठी एवढ्या योगदान देऊन,अशा पद्धतीने हकालपट्टीची कारवाई ,जर होणार असेल तर पक्षकार्याचा हाच बहुमान आहे का ?असा सवाल देखील रवी पाटील यांनी उपस्थित केला आहे.

    आताच ही कारवाई कश्यासाठी असा प्रश्न उपस्थित करत यामागे जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचाच उद्योग असल्याचा आरोप देखील तमनगडा रवी पाटील यांनी केला आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षातलं आपलं अस्तित्व वाढावं, यासाठी मुख्यमंत्री हे परदेश दौऱ्यावर गेलेले असताना आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री पदांच्या नियुक्ती मध्ये गुंतलेले असताना सचिव धनंजय कुलकर्णी यांना हाताशी धरून गोपीचंद पडळकर यांनी आपल्यावर हि राजकीय हेतूने निलंबनाची कारवाई करायला भाग पाडले आहे.

    या सर्व गोष्टींबाबत आणि पुढील भूमिका घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून आल्यावर त्यांची भेट घेणार आहे. त्यांच्यासमोर सर्व गोष्टी निदर्शनास आणून देणार आहे आणि त्यांच्या निर्णयानंतरच आपण देखील आपला निर्णय घेणार आहोत. जी काही भूमिका घ्यायची असेल ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आणि जत तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन घेतली जाईल. असे तमनगौडा रवी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

    स्वप्निल एरंडोलीकर

    लेखकाबद्दलस्वप्निल एरंडोलीकर सहारा समय मुंबईसाठी सांगलीत व्हिडिओ पत्रकार म्हणून २००९ ते २०११ या कालावधीत ३ वर्षांसाठी काम केले आहे. सांगली शहर जिल्हा रिपोर्टर म्हणून सी न्यूज चॅनेलसाठी २०१३ ते २०१९ पर्यंत काम केले आहे. जिल्हा वार्ताहर सांगली म्हणून एएम न्यूज चॅनेलसाठी २०१९ते २०२१ पर्यंत काम केले आहे. न्यूज 18 लोकमत (नेटवर्क18) स्ट्रिंगर म्हणून सांगली जिल्ह्यासाठी २०१२ ते ऑक्टो 2022-पर्यंत काम केले आहे. आता महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनसाठी जानेवारी २०२३-पासून कार्यरत आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed