Jalgaon Train Accident Reason : जळगावमधून रेल्वे अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथमदर्शनी आगीच्या अफवेमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. पण याबद्दलचे तांत्रिक कारण आता माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले आहे.
उन्मेष पाटील म्हणाले, भुसावळकडून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने कॉशन ऑर्डर सुरू असल्याने थांबा घेतला होता. यातच कॉशन ऑर्डर सुरु असताना प्रवाशांना ट्रेन थांबवल्याची माहिती जाते की काम सुरु आहे. पण नेमकं ट्रेन स्टेशनजवळ न थांबवता ती जंगलात थांबवण्यात आली. काही प्रवासी अफवेमुळे
खाली उतरले. एका बाजूला रेल्वेचा ब्लॉक होता. पण दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस आली. मात्र तिने हॉर्न दिला नाही.
‘अतिशय वेदनादायी…,’ जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक एक्सप्रेसला कदाचित कॉशन ऑर्डरची माहिती नसावी. यात कुठेतरी कम्युनिकेशन गॅप दिसत आहे आणि यातच हॉर्न किंवा सिग्नल नसल्याने प्रवासी रेल्वे पटरीजवळ बसले होते. काही दहा ते बारा प्रवासी बसले होता त्यांना ऑन द स्पॉट धडक दिली.
तर ‘आमचा कार्यकर्ता तिथे आहे. १२ जखमी प्रवाशांना पाचोऱ्याला शिफ्ट करण्यात आलेले आहे. कॉशन ऑर्डर ही स्टेशनला घेतली असती तर अपघात टळला असता. यामध्ये मुळात कम्युनिकेशन गॅपही दिसून येत आहे, असेही उन्मेष पाटील यांनी नमूद केले.