Eknath Pawar Resigns from Shiv Sena Post: एकनाथ पवार हे या वर्षापूर्वी भाजप पक्षात होते. दोन वर्षापूर्वी त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांच्यावर लोकसभा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार यांना लोहा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला.
हायलाइट्स:
- ठाकरे गटाच्या आणखी एका शिलेदाराने उद्धव ठाकरेंची सोडली साथ
- संजय राऊत, सुषमा अंधारे आणि थोरातावर गंभीर आरोप
- नांदेडमधील एकनाथ पवार यांनी दिला राजीनामा
Beed News : मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याचं खोटं पसरवलं, गावाने कुटुंबाला वाळीत टाकलं, बीडमध्ये धक्कादायक प्रकार
”माझ्या विरोधात या नेत्यांनी कटकारस्थान करून दुसरा उमेदवार बाजूला ठेवला. शिवसेनेचा एकमेव उमेदवार रिंगणात असताना मला पराभूत करण्याचं काम बबन थोरात, विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केलाय”, असा आरोप एकनाथ पवार यांनी केला. पक्षातील हे दलाल असून मराठवाड्यात पक्षाचं नुकसान करत असल्याचं देखील पवार म्हणाले. दरम्यान, एकनाथ पवार हे भाजप पक्षात घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी उमेदवारीवरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख यांच्यासह शिवसेना आणि युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाची साथ सोडली होती. त्यातच आता एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
”एकनाथ पवार यांनी अगोदर आत्मपरीक्षण करूनच शिवसेना पक्ष नेतृत्वावर बोलावे. कंधार लोहा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ पवार यांनी अगोदर स्वतः आत्मपरीक्षण करूनच शिवसेना पक्ष नेतृत्वावर बोलावे”, असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी केलं आहे. ”पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने वाळीत टाकल्यानंतर जेमतेम एका वर्षांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आल्यानंतर शिवसेना पक्ष नेतृत्वाने एकनाथ पवार यांना डोक्यावर घेतल्याने एकनाथ पवार यांच्या डोक्यात वार गेलं आहे. त्यांना तात्काळ ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे”, असं शिवसेनेचे प्रकाश मारावार यांनी म्हटले आहे. ”शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शिस्तबद्ध असलेल्या शिवसेनेचा गैरफायदा घेऊन एकनाथ पवार यांनी विविध नेत्यांमध्ये भांडणे लावून स्वतःची पोळी भाजून घेतली”, असा आरोप प्रकाश मारावार यांनी केला.