• Mon. Jan 20th, 2025

    ईव्हीएमने मोठ्ठे संख्याबळ दिले तरी शिंदे झुकतातच कसे?, पालकमंत्रीपदाच्या वादावरुन आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

    ईव्हीएमने मोठ्ठे संख्याबळ दिले तरी शिंदे झुकतातच कसे?, पालकमंत्रीपदाच्या वादावरुन आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

    Aaditya Thackeray: आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादाची तार छेडली असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादाची तार छेडली. ‘गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी वेळ, खातेवाटपासाठी वेळ, आता पालकमंत्रीपदावरुन सध्या महायुतीत वाद सुरु आहे. यावरुन समजायचं तरी काय. मी म्हणतो जे मुख्यमंत्री कोणासमोर झुकत नाही म्हणतात. मग महायुतीला ईव्हीएमने एवढे मोठे संख्याबळ मिळाले असतानाही एकनाथ शिंदे झुकतात कसे, दादागिरी सहन करण्याची गरज नाहीये त्यांना’ असे म्हणत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

    आदित्य ठाकरेंनी यावेळी भरत गोगावलेंवर देखील निशाणा साधला. ‘पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा करायचा. ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील ठीकेय. पण प्रत्येकवेळी ते जॅकेट घालावंच असं नाही. टायर जाळून रास्ता रोको करुन अशी पालकमंत्रीपदासाठी स्थगिती दिली जात असेल तर चुकीचं आहे, अशा मंत्र्‍यांना मंत्रीमंडळातून काढलं पाहिजे, हावरटरणा बरा नाही. रुसवे फुगवे किती काळ चालणार आणि या जनतेची सेवा कशी करणार, हा प्रश्न उपस्थित होतो.

    आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, गृहखात्याने पोलिसांचे हात मोकळे केले तर ते कोणालाही पकडू शकतात. सैफ अली खानचा हल्लेखोर बांग्लादेशी असल्याचे समजते. मग देशात आणी राज्यात भाजपचे गृहमंत्री असताना बांग्लादेशी भारतात घुसतातच कसे, त्यांना भाजप कसे रोखू शकले नाही. हे केंद्र सरकारचे अपयश आहे. गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने किती जणांना बाहेर पाठवले याची आकडेवारी सादर करावी. ६ ते ८ महिन्यांपूर्वी आला आणि तो माजी घटनाबाह्य मुख्यमंत्र्‍यांच्या जिल्ह्यात राहिला. पण तिकडे बांग्लादेशातील हिंदू आक्रोश करत आहेत की, आम्हाला भारतात घ्या पण त्यासाठी भाजप काही करु शकत नाही.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed