• Mon. Jan 20th, 2025
    सोसायटीमध्ये अवैधरित्या मोटारपंप, वॉचमनने हात लावताच फेकला गेला; इमारतीमध्ये अनर्थ घडला

    Palghar News : पालघर शहरातील टेंभोडे येथील सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरात धक्कादायक घटना कैद झाली आहे. वॉचमनला इमारतीमध्ये विजेचा धक्का लागून अनर्थ घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Lipi

    नमित पाटील, पालघर : पालघर येथील सोसायटीमध्ये विजेच्या धक्क्याने वॉचमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोसायटीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील पाण्याचा फोर्स वाढवण्यासाठी बसवण्यात आलेला मोटारपंप सुरू करण्यासाठी वीज जोडणी करत असताना विजेचा झटका लागल्याने वॉचमनचा मृत्यू झाल्याची घटना टेंभोडे परिसरात घडली आहे. कमल साऊद असे या घटनेतील मृत वॉचमनचे नाव आहे.
    पुण्यातील बहीण-भाऊ केरळच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत; चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण समोर

    सोसायटीमध्ये अवैधरित्या मोटारपंप बसवला

    पालघर शहरातील टेंभोडे परिसरात श्रीपती सोसायटी असून या सोसायटीत नगरपरिषदेमार्फत देखील पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाणीपुरवठ्यातील पाण्याचा फोर्स वाढवून पाणी अधिक क्षमतेने आणि लवकरात लवकर सोसायटीतील टाकीत चढवण्यासाठी अवैधरित्या एक मोटारपंप बसवण्यात आला आहे.
    हा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मोटरपंप सुरू करून त्याद्वारे पाणीपुरवठ्यातील पाणी सोसायटीच्या टाकीत चढवण्यात येत होते. नेहमीप्रमाणे मोटारपंप सुरू करण्यासाठी सोसायटीतील वॉचमन कमल साऊद मोटारपंपाची वीज जोडणी करत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका लागला.
    आईसोबत ट्यूशनला निघालेली, मागून टिप्परने फरफटत नेलं; आईच्या डोळ्यासमोर चिमुकलीचा अंत, शहरात हळहळ

    विजेच्या धक्क्याने वॉचमनचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

    या दुर्घटनेत वॉचमन कमल साउद यांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सोसायटीच्या निष्काळजीपणामुळे वॉचमन कमल यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मोटारपंप सुरु करण्यासाठी विज जोडणी करत असताना वॉचमन यांचा विजेचा झटका लागून झालेल्या मृत्यूची घटना सोसायटी परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    सोसायटीमध्ये अवैधरित्या मोटारपंप, वॉचमनने हात लावताच फेकला गेला; इमारतीमध्ये अनर्थ घडला

    पालघर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद

    दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांमार्फत करण्यात आला असून याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पालघर पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेने, वॉनमनच्या अशाप्रकारे निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसंच सोसायट्यांमध्येही विजेच्या उपकरणांबाबत योग्य ती काळजी घेण्याचं यानिमित्ताने समोर येत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed