• Sun. Jan 19th, 2025

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिकमध्ये उत्स्फूर्त स्वागत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 19, 2025
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिकमध्ये उत्स्फूर्त स्वागत – महासंवाद




    स्वित्झर्लंड, दि. १९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॅानॉमिक फोरममध्ये उपस्थित राहण्यासाठी आज झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे आगमन झाले. हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्यावतीने त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान व्यक्त करत, स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत त्यांचे स्वागत केले.

    याप्रसंगी, झ्युरिकमधील लहान मुलांनी मराठी गौरवगीत सादर करत ‘पुन्हा येण्या’ची भावना अधोरेखित केली. वेदांत, हृषिकेश, रश्मी आणि अद्विका या चिमुकल्या दोस्तांनी आपल्या निरागस शुभेच्छा देऊन उपस्थितांचे मन जिंकले.

    या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुलकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह उपस्थित होते. सकाळी ६ वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध भागांतून मराठी बांधव आवर्जून उपस्थित राहिले.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, “या स्वागताने मला घरच्याप्रमाणे वाटले. महाराष्ट्राच्या ऊर्जेची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना येथे अनुभवली.”

    मुख्यमंत्री फडणवीस ‘दावोस समिट २०२५’ साठी झ्युरिकमध्ये दाखल झाले आहेत.

    ००००

     







    धनंजय मुंडेंसाठी कौतुकोद्गार, छगन भुजबळांवर मात्र मौन; राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबिरातील अजित पवारांचं विधान काय सांगतं?
    विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन – महासंवाद
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed