शिर्डीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या समारोपादिवशी धनंजय मुंडे शिर्डीत दाखल झाले. आज (१९ जाने.) सकाळी धनंजय मुंडेंनी साईबाबांचे दर्शन घेतले. बीडचे पालकमंत्री पद अजित पवारांकडे दिल्यानंतर मुंडेंनी आपलं मत व्यक्त केलं. अजित पवारांनी पुण्याचा विकास केला तसा बीडचा करावा, असं ते म्हणाले. तर वाल्मिक कराडसोबत आर्थिक संबंध असल्याचा दावा खोटा असल्याचंही ते म्हणाले.