Wife Killed Husband: अपत्य होत नसल्याने पत्नीने तिच्या दोन भावांच्या साथीने पतीवर चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आडगाव पोलिसांच्या हद्दीतील हिंदुस्थान नगराजवळील रस्त्यावर घडली.
हायलाइट्स:
- भावसारची पहिली पत्नी निरमा व सुनीता सावत्र बहिणी
- दुसरी पत्नी सुनीता अपत्य होत नसल्याने नाराज
- तिने गुजरातमध्ये जाऊन भावसारशी वाद घातले होते
- पत्नीसह शालकांनी मिळून दाजीचा ‘काटा’ काढला
- पहिल्या पत्नीकडे अधिकवेळ राहतो, या कारणातूनही खून झाल्याचा संशय
Girish Mahajan: नाशिकचे पालक गिरीश महाजनच; धनंजय मुंडेंना धक्का, दादा भुसेंनाही वगळले
दरम्यान, शुक्रवारी सकाळी निरमा ही पती भावसार आणि अकरा वर्षीय मुलगी आलमसोबत गुजरातहून आडगावमध्ये आईवडिलांना भेटण्यासाठी आली. त्यावेळी निरमा व सुनीता या सवतींमध्ये पतीशी लग्नावरून तसेच अपत्य होत नसल्याच्या कारणात वाद सुरू झाले. सुनीताचे सख्खे भाऊ राज व आदित्यही त्यात पडले. दिवसभर काहीतरी कारणातून सतत खटके उडाल्यानंतर रात्री साडेआठ वाजता भावसारच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे निरमा व इतर नातलगांनी धाव घेतली. यावेळी सुनीता, तिचे दोन भाऊ तसेच नातलग दीपक व एक अनोळखी व्यक्ती भावसारला मारहाण करीत होते. राजने भावसारच्या पोटावर, छातीवर, पाठीत चाकूने वार केले. आदित्यने डोक्यात रॉड टाकून जखमी केले.
राज्य सरकारकडून खर्चाला कात्री; १५ फेब्रुवारीनंतर कुठल्याही प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही
रक्तबंबाळ अवस्थेत भावसार पत्नी निरमाजवळ आला. त्याला निरमासह इतरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त पद्मजा बढे, आडगावचे वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार, सहायक निरीक्षक निखिल बोंडे यांचे पथक दाखल झाले. त्यांनी संशयित सुनीताला ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.