• Sun. Jan 19th, 2025
    Maharashtra Guardian Ministers : अजित दादा पुणे आणि बीडचे कारभारी, पंकजा मुंडेंना लॉटरी, धनुभाऊंचा पत्ता कट, पाहा संपूर्ण यादी

    Maharashtra Guardian Ministers List Marathi News : महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या पालकमंत्रिपदाची यादी अखेर जाहीर करण्यात आलीय. तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे ते जाणून घ्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या पालकमंत्रिपदाची यादी अखेर जाहीर करण्यात आलीय. या यादीमध्ये तीन जणांना सहपालकमंत्रिपद देण्यात आलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीड आणि पुणे या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवलीय. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून विरोध दर्शवला जात होता. संतोश देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. पंकजा मुंडे यांना जालनाचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी जाणून घ्या.

    तीन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये दोन पालकमंत्री करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ ऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना ही जबाबदारी दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमचे पालकत्व दिले आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात स्पर्धा होती. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे.

    गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
    नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
    ठाणे – एकनाथ शिंदे
    पुणे – अजित पवार
    बीड – अजित पवार
    सिंधुदुर्ग- नितेश राणे
    अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
    अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
    वाशिम – हसन मुश्रीफ
    सांगली – चंद्रकांत पाटील
    सातारा -शंभुराजे देसाई
    छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
    जळगाव – गुलाबराव पाटील
    यवतमाळ – संजय राठोड
    कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
    अकोला – आकाश फुंडकर
    भंडारा – संजय सावकारे
    बुलढाणा – मकरंद जाधव
    चंद्रपूर – अशोक ऊईके
    धाराशीव – प्रताप सरनाईक
    धुळे – जयकुमार रावल
    गोंदिया – बाबासाहेब पाटील
    हिंगोली – नरहरी झिरवळ
    लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
    मुंबई शहर – एकनाथ शिंदे
    मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
    नांदेड – अतुल सावे
    नंदुरबार – माणिकराव कोकाटे
    नाशिक – गिरीष महाजन
    पालघर – गणेश नाईक
    परभणी – मेघना बोर्डीकर
    रायगड – अदिती तटकरे
    सिंधुदुर्ग- नितेश राणे
    रत्नागिरी – उदय सामंत
    सोलापूर – जयकुमार गोरे
    वर्धा – पंकज भोयर
    जालना – पंकजा मुंडे

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed