Carnac Bridge Mumbai: मुंबई महापालिकेकडून कर्नाक पुलाची पुनर्बांधणी सुरू आहे. दुसरा गर्डर स्थापित करून नवा कर्नाक उड्डाणपूल जून २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे.
मुंबई महापालिकेकडून कर्नाक पुलाची पुनर्बांधणी सुरू आहे. पुलासाठी ५५० मेट्रिक टन वजनाचा, उत्तर बाजूचा गर्डर महापालिकेच्या हद्दीत ९.३० मीटरपर्यंत सरकवण्याची प्रक्रिया १४ जानेवारी रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या पुढील काम रेल्वे हद्दीत असल्याने ते पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेकडे ब्लॉकची मागणी केली होती.
Central Railway Megablock: कर्जत यार्डसाठी आज व रविवारी ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? वाचा Timetable
शनिवारी १८ जानेवारीची मध्यरात्र ते रविवार १९ जानेवारीची पहाट या दरम्यान मध्य रेल्वेने ब्लॉकचे नियोजन केले होते. मात्र रविवारी मुंबई मॅरेथॉन असल्याने रात्री उशिरापर्यंत विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. यामुळे २५ जानेवारी मध्यरात्र ते २६ जानेवारी पहाटेपर्यंत ब्लॉक मंजूर करण्यात आला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ लॅम्बोर्गिनी कारबाबत विखे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कारमध्ये रोहित पवार…
कर्नाक पूलाची पाडणी झाल्यानंतर, दक्षिण मुंबईतील मशिद परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरात प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी कर्नाक पूलाची पुनर्बांधणी नियोजनबद्ध वेळेत पूर्ण करण्याकडे मुंबई महापालिकेचा कल आहे. तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेले काम महापालिकेचे प्रमुख अभियंता आणि संबंधित अधिकारी यांच्यासह तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. दुसरा गर्डर स्थापित करून नवा कर्नाक उड्डाणपूल जून २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे.