Central Railway Megablock: कर्जत रेल्वे यार्ड सुधारणेच्या कामांसाठी कर्जत रेल्वे स्थानकातील पोर्टल्स काढून टाकण्यासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारी आणि रविवारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.
शुक्रवार
स्थानक – पळसधरी ते भिवपुरी रोड
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – दुपारी १.५० ते दुपारी ३.३५ पर्यंत
पालकमंत्री लवकरच? अंतिम निर्णयासाठी महायुतीच्या नेत्यांची दोन दिवसांत होणार बैठक
परिणाम – बदलापूर ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द राहणार आहेत. दुपारी १२.२० ची सीएसएमटी- खोपोली आणि दुपारी १.१९ सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकात रद्द करण्यात येणार आहे. १.४० सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरमध्ये थांबवण्यात येईल. दुपारी १.५५ कर्जत-सीएसएमटी आणि १.४८ खोपोली-सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकातून रवाना करण्यात येणार आहे. कर्जत येथून ३.२६ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल बदलापूर स्थानकावरून धावणार आहे.
मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ लॅम्बोर्गिनी कारबाबत विखे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कारमध्ये रोहित पवार…
रविवार
स्थानक – पळसधरी ते भिवपुरी रोड
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.२० ते दुपारी १.०५
परिणाम – ब्लॉक वेळेत नेरळ आणि खोपोली दरम्यान लोकल रद्द राहतील. स. ९.२७ आणि ११.१४ची सीएसएमटी-कर्जत लोकल नेरळ स्थानकात थांबवण्यात येईल. सकाळी ११.१९ ते दुपारी १ दरम्यान सुटणाऱ्या लोकल नेरळ स्थानकातून धावतील. गाडी क्र.११०१४ कोईम्बतूर- एलटीटी लोणावळ्यात थांबवण्यात येईल. गाडी क्र. १२४९३ पुणे-हजरत निजामुद्दीन गाडी क्र.१२१६४ चेन्नई- एलटीटी पुणे विभागात थांबवण्यात येणार आहे.