Jalgaon Accident News : जळगाव शहरातील अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. शिव कॉलनीतील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने भीषण घटना घडली आहे.
सुटणार नाही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर; ८० हून अधिक एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात आहे तपास
जळगाव शहरात अनेक अपघातांच्या मालिका या सुरू आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच एका डंपरने मामा – भाचे यांना धडक दिल्याने ९ वर्षीय चिमुकला जागीच ठार झाला होता. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी एकत्र येत डंपर पेटवून दिला होता. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा भीषण अपघातात भारमल पाटील यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आपको क्या चाहिये? सैफच्या मेडचा सवाल, हल्लेखोराकडून एक कोटींची मागणी; FIRमध्ये मोठी अपडेट समोर
नेमकं काय घडलं?
जळगाव शहरातील शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाण पुलावर अज्ञात ट्रकने दुचाकीला मागून धडक देत दुचाकीस्वार वृध्दाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, १६ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हापेठ पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात येऊन शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भारमल कौतिक पाटील वय-६२ रा. वैजनाथ ता. एरंडोल असं अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचं नाव आहे. भारमल त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे.
आधी तीन महिलांना उडवलं, नंतर पोलिसांकडून पाठलाग; कंटेनरची एकामागे एक तब्बल १५ वाहनांना धडक
नागरिकांकडून संताप व्यक्त
भारमल पाटील हे वृध्द आपल्या पत्नीसह एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथे वास्तव्याला होते. शेतीकरून आपला उदरनिर्वाह करत होते. आयुर्वेदीक उपचार करण्यासाठी भारमल पाटील जळगाव दुचाकीवरुन (क्रमांक – एमएच १९ बी डब्ल्यू २७३०) जळगाव शहरात येण्यासाठी निघाले. गुरूवारी १६ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेत भारमल पाटील हे रस्त्यावर पडने आणि ट्रकने त्यांना चिरडले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक आणि जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. सततच्या अपघातांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.