Authored byमानसी देवकर | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम15 Jan 2025, 11:22 am
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महायात्रेतील महत्त्वाचा विधी मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता संपन्न झाला. या यात्रेत दरवर्षी गाईच्या वासराकडून भाकणूक विधी पार पडते. भाकणूक म्हणजे भविष्यवाणी. मानकरी देशमुख यांच्याकडे ‘वासरु भाकणूक’ हा विधी संपन्न होतो. वासराने केलेल्या कृतीवरून भविष्यवाणी केले जाते. या भाकणुक संदर्भात यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी माहिती दिली आहे.