Vashi Hit And Run Case : रविवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीवरून जाणाऱ्या दोन तरुणींचा मृत्यु झाला होता. रस्त्यावरील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंमुळे पोलिसांंना शोध कार्यात अडचणी येत होत्या. परंतु, घटनास्थळी पडलेल्या गाडीच्या तुटलेल्या नंबर प्लेटचे तुकडे जुळवून त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आहे.
रविवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीवरून जाणाऱ्या दोन तरुणींचा मृत्यु झाला होता. रस्त्यावरील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंमुळे पोलिसांंना शोध कार्यात अडचणी येत होत्या. परंतु, घटनास्थळी पडलेल्या गाडीच्या तुटलेल्या नंबर प्लेटचे तुकडे जुळवून त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आहे.
या अपघातातील स्कॉडाचालक डॉ. कादिया हा रविवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या कारमधून वाशी येथून ठाण्याच्या दिशेने जात होता. यावेळी तो पामबीच मार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात असताना, कोपरा पुलाजवळ बोनकोडे येथे स्कुटीवरून जाणाऱ्या दोन तरुणींना त्याने जोरदार धडक दिली होती. त्यात स्कुटीचालक संस्कृती खोकलेचा जागीच, तर अंजली पांडेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तपासात अडचण
या अपघातानंतर डॉ. कादिया याने जखमी तरुणींना कुठल्याही प्रकारची मदत न करता, तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना न देताच पलायन केले होते. या अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर या मार्गावरील बहुतेक सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे या अपघातातील आरोपी कार चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना बऱ्याच अडचणी आल्या.
नंबरप्लेटचे तुकडे एकत्र जुळवून कारचा शोध
झालेल्या अपघातातील स्कॉडा कारने स्कुटीला जोरात धडक दिल्यामुळे स्कुटीवरील दोन्ही तरुणी हवेत फेकल्या गेल्या. या धडकेमुळे स्कॉडाच्या नंबरफ्लेटचे तुकडे होऊन ते रस्त्यावर पडले. पोलिसांना सीसीटीव्हीतून काहीच मदत न मिळाल्याने अखेर रस्त्यावर पडलेले स्कॉडा कारच्या नंबरप्लेटचे तुकडे एकत्र करून, त्याद्वारे नंबर जुळवून कारचा शोध घेतला. त्यानंतर सदरची स्कॉडा कार ठाण्यातील एमडी डॉक्टरची असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी रविवारी रात्री डॉ. अनिल बद्रिनाथ कादियाला ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले.