महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिशिंगणापूर येथे शनी दर्शन घेतलं.महाराष्ट्राची सेवा करण्याच्या संधीचं सोनं करण्याची शक्ती आम्हाला शनि देवाने द्यावी असं मागणं मुख्यमंत्र्यांनी मागितलं.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करतील असं फडणवीस म्हणाले. जेवढे पुरावे आहेत त्या सर्व पुरावांच्या आधारावर कारवाई होईल कुणीही सुटणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडवणीस यांनी दिली.