• Sun. Jan 12th, 2025

    Vasant More : ‘कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते’; वसंत मोरेंचे खासदार कोल्हेंना प्रत्युत्तर

    Vasant More : ‘कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते’; वसंत मोरेंचे खासदार कोल्हेंना प्रत्युत्तर

    Vasant More Twit : महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये पराभवानंतर मतभेद दिसत आहेत. महापालिका निवडणुकांसाठी पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांनी काँग्रेस व ठाकरे गटावर टीका केली होती. विद्यमान परिस्थितीमुळे आघाडी टिकणार की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : विधानसभान निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवनंतर महाविकास आघाडीमध्ये सुरळित नसल्याचं दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष आता तयारीला लागताना दिसत आहेत. यादरम्यान आघाडीमधील पक्ष एकमेकांवर टीका करू लागल्याने पालिका निवडणूक एकत्र न लढवता स्वबळावर लढण्याची आता दाट शक्यता आहे. अशातच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या मित्रपक्षांवर टीका केली होती. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही आणि ठाकरेंची शिवसेना अद्याप झोपेतून उठायला तयार नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच नेते वसंत मोरे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

    विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही. तर शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही, असं अमोल कोल्हे पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हणाल्याचे वृत्त आहे. तर मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाला विरोधीपक्ष म्हणून वाढण्यास स्पेस असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं होतं.

    खासदार साहेब जर निवडणुका झाल्यानंतर म्हणत असतील की शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजुन झोपेतून जागा झाला नाही तर साहेब एक गोष्ट लक्षात ठेवावी आम्ही शिवसेना म्हणून चांगले जागे आहोत. कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, असं वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    महाविकास आघाडीमध्ये वणवा

    महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाले होते. महायुतीला चारीमुंड्या चीत केलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रात ३० खासदार निवडून आल्यावर मविआने पकड मिळवली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये या निकालाप्रमाणे निकाल लागेल असं वाटलं होतं. नाहीतर निवडणूक चुरशीची होईल असाच राजकीय जाणकारांचाही अंदाज होता. मात्र सर्व काही उलटं झालं. महायुतीने जोरदार मुसंडी घेतली आणि पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन केले. शरद पवार स्वत: मैदानात उतरले होते आणि राज्यभर प्रचारसभा घेतल्या. पण पवारांचे बलस्थान असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्येही त्यांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं. आता महाविकास आघाडीमध्ये महापालिका निवडणुकीआधीच स्वबळावर लढण्याची गळ कार्यकर्ते घालत आहेत. त्यामुळे आघाड राहते की नाही हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *