• Tue. Sep 15th, 2026

आजपासून टी 20i मालिकेचा थरार

ByMH LIVE NEWS

Mar 15, 2026
आजपासून टी 20i मालिकेचा थरार

मुंबई

टीम इंडियाने रविवारी 8 मार्च रोजी इतिहास घडवला. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. भारताने या सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी लोळवलं. टीम इंडियाने या विजयासह एकूण तिसरा तर सलग दुसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. तसेच इंडिया गतविजेता म्हणून मायदेशात वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच टीम ठरली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला आपली ताकद दाखवून दिली. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचं आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. न्यूझीलंडला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 फायलनंतर आता टीम इंडिया थेट जून महिन्यात आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावणारी न्यूझीलंड रविवार 15 मार्चपासून द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंड मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. दोन्ही संघ टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यानंतर आमनेसामने असणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वर्ल्ड कप संघातील 8 खेळाडूंना बाहेर केलं आहे. या 8 खेळाडूंमध्ये कोण कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

8 खेळाडू आऊट

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत संधी न देता 8 खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या 8 खेळाडूंमध्ये जेकब डफी, मॅट हेन्री, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलीप्स, रचीन रवींद्र, फिन एलन आणि टीम सायफर्ट यांचा समावेश आहे. हे 8 खेळाडू टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग होते. तसेच यापैकी बहुतांश खेळाडू हे आगामी आयपीएलच्या स्पर्धेच्या 19 व्या मोसमात खेळणार आहे. या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

तिघांना पहिल्यांदाच संधी

तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी निवड समितीने पहिल्यांदाच 3 खेळाडूंना संधी दिली आहे. निक केली, जेडन लेनॉक्स आणि केटन क्लार्क अशी यांची नावं आहेत. त्यामुळे या तिघांचं या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टी 20i पदार्पणाची संधी मिळते का? याकडे लक्ष असणार आहे.

पहिला सामना किती वाजता?

दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20I सामना बे ओव्हल, माउंट मौंगानुई इथे आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed