जोरगेवारांची वडेट्टीवारांना थेट ऑफर : फडणवीसांना चंद्रपूरचे पालकमंत्री होण्याची विनंती, मंत्री पदासाठी स्वतःचं नाव गेलं पुढं
चंद्रपूर : आडनावात ‘ वार ‘ असलेले जिल्हात तीन आमदार आहेत. “जिल्हाला मंत्रिपद हवे होते, तेही वारांना. एक मंत्री शिल्लक आहे. ते मंत्रिपद कदाचित तिसऱ्या वारासाठी ठेवलेले आहे,” असे बोलत आमदार किशोर जोरगेवार यांनी विजय वडेट्टीवार यांना जाहीररित्या भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्याचेही पालकत्व स्वीकारावे अशी विनंती जोरगेवारांनी केली.सोबतच माझ्या आडनावात वार आहे, याची आठवण करून देत मंत्रीपदासाठी स्वतःचे नाव पुढे केले.राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जोरगेवार बोलत होते.