School Students Filled Potholes On Road : रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खड्डे बुजवण्यासाठी कामाला लावलं
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पेंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत ११० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शिकवण्यासाठी ६ पुरुष शिक्षक, तर ४ महिला शिक्षक कार्यरत आहेत. गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथून आणि भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून ये – जा करणाऱ्या शिक्षकांना त्रास होतो.
भर ट्रॅफिकमध्ये कार चालकाला रक्तबंबाळ केलं, पत्नी आणि मुलीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पुण्यातील संतापजनक घटना
पालकांकडून संताप व्यक्त
शाळेत येण्या-जाण्याच्या मार्गावर खड्डे असल्याची बाब शिक्षकांनी संबंधित विभागाला कळवण्याऐवजी, शाळकरी मुलांना खड्डे बुजवण्यासाठी जुंपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून पालकांमधून शिक्षकांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील घटना
जिल्हा परिषदेचे शिक्षक कामचुकारपणा करतात. कामाच्या ठिकाणी राहत नाही. यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याचं सांगत आमदार प्रशांत बंब सातत्याने शिक्षकांवर टीका करत असतात. याच आमदारांच्या मतदारसंघांमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनाच कामाला लावल्याच्या घटनेने रोष व्यक्त केला जात आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त
मुख्याध्यापक म्हणाले मी बाहेर, मला माहित नाही….
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारला असता ते म्हणाले की शिष्यवृत्तीच्या बैठकीसाठी मी गंगापूर येथील बैठकीसाठी आलो होतो. यामुळे खड्डे बुजवण्याच्या प्रकारासंदर्भात मला माहिती नाही. मात्र असं काही असेल तर शिक्षकांना समज दिली जाईल, असं पेंढापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय इंगळे म्हणाले.