• Fri. Jan 10th, 2025

    विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्व‍ित केलेल्या संगणक कार्यप्रणालीविषयी सदस्यांना सुयोग्य पद्धतीने अवगत करावे – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 9, 2025
    विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्व‍ित केलेल्या संगणक कार्यप्रणालीविषयी सदस्यांना सुयोग्य पद्धतीने अवगत करावे – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद




    मुंबई, दि. 9 :- विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीविषयी सदस्यांना सुयोग्य पद्धतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सदस्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी,असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

    विधान भवन, मुंबई येथे आज विधानमंडळ कामकाज आढावासंदर्भात सभापती प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्याप्रसंगी प्रा. शिंदे  बोलत होते. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव-2 (कार्यभार) डॉ. विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील  अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, बांधकाम सुरू असलेल्या नूतन मनोरा आमदार निवासचे बांधकाम सुरू झाले असून त्यामध्ये सभागृह, वाचनालय, अद्ययावत वाहनतळ, सुसज्ज भोजन कक्ष, सदस्य आणि सहायकांसाठीची प्रशस्त निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. मॅजेस्टीक आमदार निवासचे देखील वारसा वास्तुवैभव कायम ठेऊन अतिशय देखणे असे नूतनीकरण करण्यात येत आहे. प्रामुख्याने पीठासीन अधिकारी यांच्या निवासासाठी मलबार हिल येथे ‘अजिंठा’ इमारतीची सुसज्ज वास्तू उभारण्यात येत आहे. ही सर्व बांधकामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत आणि सदस्यांना तातडीने त्याचा लाभ प्राप्त व्हावा यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने उचित कार्यवाही करावी अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed