• Fri. Jan 10th, 2025
    जळगाव हादरलं, तोंडाला रुमाल, बुलेटवरुन येत हवेत गोळीबार; CCTVत दिसला धक्कादायक प्रकार

    Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये काही अज्ञातांनी एका व्यक्तीच्या घरासमोर गोळीबार करत दगडफेक केली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    Lipi

    निलेश पाटील, जळगाव : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. बीड जिल्ह्यातील बंदूकधारी लायसन्स धारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीही जळगाव जिल्ह्यात हेच बंदूकधारी आता हवेत गोळीबार करून दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम करत आहेत. हवेत गोळीबारीच ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    काय आहे नेमकं प्रकरण?

    चाळीसगाव शहरातील पोतदार इंटरनॅशनल स्कूलजवळ मंगळवारी ७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करत एका व्यक्तीच्या घरावर दगडफेक केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली आहे.
    खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
    पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सारंग अशोक बेलदार, वय ४९ रा. पोतदार हायस्कूल चाळीसगाव याच्या घरासमोर मंगळवारी ७ जानेवारी रोजी ११.४५ वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर सहा जण आले. सर्वांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. बुलेट मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकाने हवेत गोळीबार केला.
    Washim News : मतिमंद मुलाने जन्मदात्याला संपवलं, नंतर मृतदेहाजवळच बसून राहिला; धक्कादायक कृत्याने खळबळ
    सारंग बेलदार यांच्या घराच्या पार्चमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केलं. तर पार्च बाहेर काचेची बाटली फोडून शिवीगाळ करत दुचाकीवरून सहा जण पसार झाले. हा गोळीबार जुन्या वादातून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. गोळीबार करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबार करून संशयित आरोपी फरार होत असताना, तसंच हवेत गोळीबार करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे पोलीसांनी संशयित संकेत उर्फ बाळू मोरे रा. हनुमान वाडी चाळीसगाव याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरातून ६ जिवंत काडतूस, पिस्तूल मॅगझीन, कोयता, गुप्ती, स्टील रॉड आणि बेसबॉल खेळण्याची लाकडी बॅट अशी हत्यारं आढळून आली आहेत.

    जळगाव हादरलं, तोंडाला रुमाल, बुलेटवरुन येत हवेत गोळीबार; CCTVत दिसला धक्कादायक प्रकार

    या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी करत आहे.

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचं प्रकरण राज्यात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील बंदूक परवानाधारकांचे परवाने देखील रद्द करण्याचा निर्णय तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र तरीही जळगाव जिल्ह्यात देखील हवेत गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या या मोकाट गुन्हेगारांवर शासन काय कार्यवही करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed