• Tue. Jan 7th, 2025
    Vasai News: बेशिस्तीची गाडी सुसाट; वसईत गेल्या वर्षभरात ५७ हजार २४३ वाहनचालकांवर कारवाई

    Vasai -Virar News: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वसई विभागामध्ये वाहनचालकांची ही बेशिस्तीची गाडी सुसाट सुटली असून, वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात ५७ हजार २४३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    vasai traffic

    वैष्णवी राऊत, वसई : विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, सीटबेल्ट न लवणे, विनापरवाना, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, नंबर प्लेट नसणे, मद्यपान करून गाडी चालवणे अशा वाहनचालकांवर बेशिस्त वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असते. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वसई विभागामध्ये वाहनचालकांची ही बेशिस्तीची गाडी सुसाट सुटली असून, वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात ५७ हजार २४३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

    सन २०२४ या वर्षभरात कारवाई केलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक केलेल्या कारवाईत एकूण चार कोटी ३३ लाखांचा दंड वाहनचालकांना आकारण्यात आला आहे. यातील एक कोटी ४८ लाखांची दंडाची रक्कम वाहतूक विभागातर्फे वसूल करण्यात आली आहे. वसईमध्ये सध्या दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून, त्याबरोबर रस्त्यावरील वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी असलेले अरुंद रस्ते, नियमांचे उल्लंघन करणारे गतिरोधक, वाहतूक कोंडीची समस्या अशा विविध समस्याना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी अनेक वाहनचालक सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. तर काही वाहनचालक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्टंट अथवा ओव्हरटेक करतात. अशा बेशिस्त वाहनचालकांवर लगाम लावण्यासाठी वसईच्या वाहतूक विभागाने दिवसरात्र पहारा देत कारवाई केली आहे.
    Ramesh Bidhuri: दिल्लीतील रस्ते प्रियांका यांच्या गालासारखे करु; भाजप नेते रमेश बिधुडी यांची जीभ घसरली
    सन २०२४ या वर्षभरात वसईच्या वाहतूक विभागाने ५७ हजार २४३ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यामध्ये स ीिटबेल्ट न लवणे, विना हेल्मेट, विरुद्ध दिशेने गाडी चालविणे, विनापरवाना, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, नंबर प्लेट नसणे, मद्यपान करून गाडी चालविणे अशा वाहनचालकांचा समावेश आहे. या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना एकूण चार कोटी ३३ लाख ८७ हजार ५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्या १७५२ जणांवर कारवाई केली आहे. वसई, विरार शहरात हेल्मेटसक्ती नाही. मात्र, महामार्गावर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. या कारवाया मुख्यतः मुंबई-अहमदाबाद महामागांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर करण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या १४३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील बेशिस्त वाहनचालकांची संख्या कमी होत नसून, ती वाढत आहे. त्यामुळे त्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागातर्फे अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे वसईच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले.
    Nashik: ‘सिव्हिल’मधील बाळ चोरीचा १२ तासांत उलगडा, एमबीए महिलेचं कृत्य, कारण धक्कादायक
    रस्त्यांचे योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी
    वसई-विरार शहरात सध्या ठिकठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शहरातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी ही नालासोपारा पूर्व तुळीज भागात, तसेच वसई, नालासोपारा आणि विरार येथील रेल्वे स्थानक परिसरात होत असते. त्यातच शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, दुसरीकडे पाहता रस्ते अरुंद पडत आहेत. वर्षांनुवर्षे शहरातील अनेक मुख्य रस्त्यांची रुंदी ही जैसे थे अवस्थेत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली अवैध पार्किंग, रस्त्यांवर झालेले अतिक्रमण याचा परिणाम हा शहरातील वाहतुकीवर होतो. यासाठी सर्वांत आधी रस्त्यांचे योग्य नियोजन करून कोंडी सोडवावी. यासह रस्त्यावरील वाहनांचे आणि इतर अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी वाहनचालकांतर्फे करण्यात येत आहे.
    Anjali Damania: मला त्यांच्याकडून धमकीचे ६०० कॉल; देशमुख हत्या प्रकरणावरुन अंजली दमानियांचा गौप्यस्फोट
    ■ धोका किंवा अडथळे निर्माण करणे १६३८७
    ■ विना हेल्मेट १,७५२
    ■ विनापरवाना ५६०
    ■ अवैध परवाना ४५
    ■ रिक्षाचालक १३.८१७
    ■ मद्यपान करून गाडी चालवणे १४३
    ■ इतर कारवाया २४५३९
    ■ एकूण ५७,२४३

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed