Sandeep Kshirsagar on Walmik Karad : वाल्मिक कराड याचा 6, 9, 11 या तीन दिवसांचा सीडीआर काढावा आणि तो तपासावा. त्यानंतर वाल्मिक कराडच नाही तर मोठमोठाले दिग्गज या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर येईल, असा दावा संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
संदीप क्षीरसागर म्हणाले, वाल्मिक कराड याचा 6, 9, 11 या तीन दिवसांचा सीडीआर काढावा आणि तो तपासावा. त्यानंतर वाल्मिक कराडच नाही तर मोठमोठे दिग्गज या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर येईल. हे प्रकरण अंडर ट्रायल व फास्टट्रॅक कोर्टात चालवावे तसेच हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
सरपंच देशमुखांची हत्या अन् आरोपी घुलेच्या भावाची पोस्ट, त्यात ३३३३ नंबर; खुनाशी काय कनेक्शन?
यासोबतच आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप करत म्हणाले की जेव्हा जेव्हा हा तपास वाल्मीक कराड पर्यंत येतो तेव्हा तेव्हा हा तपास थांबतो. सरकार तपास चांगल्या प्रकारे करत आहे पोलीसही मेहनत घेत आहेत. याविषयी कसली शंका नाही पण जेव्हा तपासाचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत येतात तेव्हा तेव्हा मात्र तपास थांबत असल्याचे आम्हाला दिसत आहे, असे म्हणत स्टेजवरच क्षीरसागरांना भाजप आमदार सुरेश धस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे.