• Thu. Jan 9th, 2025

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 3, 2025
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन – महासंवाद




    नवी दिल्ली, दि. ०३: पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले.

    कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनातील दर्शनी भागात आयोजित कार्यक्रमात बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग आप्पा सोनवणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार तसेच महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित अन्य कार्यक्रमात निवासी आयुक्त नीवा जैन यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

    महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed