• Wed. Jan 8th, 2025
    विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे उत्पन्न ५३ कोटी; गेल्या वर्षभरात सव्वा कोटी भाविकांनी घेतलं दर्शन

    Vitthal Rukmini Mandir: भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस वर्षभरात ५३ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

    महाराष्ट्र टाइम्स
    vitthal rukmini temple

    म.टा.वृत्तसेवा, सोलापूर: दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपुरात गेल्या वर्षात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी १ कोटी २५ लाख भाविक आल्याची नोंद झाली आहे. या भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस वर्षभरात ५३ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

    या दानामध्ये श्रींच्या चरणाजवळ सहा कोटी २५ लाख ८९ हजार ७९७ रुपये, लाडू प्रसादामधून पाच कोटी ८५ लाख २६ हजार ९०० रुपये, देणगीच्या माध्यमामधून आठ कोटी १८ लाख ९८ हजार ४१७ रुपये, भक्त निवासामधून नऊ कोटी ८४ लाख ७८ हजार २७९ रुपये, पूजेमधून दोन कोटी ३३ लाख ८६ हजार ३१२ रुपये, फोटो, मोबाइल अनामत, लॉकरभाडे व महावस्त्र विक्री यातून ९२ लाख ३३ हजार ४९ रुपये, हुंडी पेटीमधून सात कोटी ५६ लाख ७४ हजार ५२ रुपये, दान सोने-चांदीचे मूल्य दोन कोटी ७२ लाख ४ हजार ४५०, परिवार देवता मंदिरांमधून तीन कोटी नऊ लाख १४ हजार २०३, विधी उपचारांमधून ५९ लाख ८८ हजार ४३७ तसेच इतर जमेमधून सहा कोटी ५८ लाख ११ हजार ८५६ असे एकूण ५३ कोटी ९७ लाख ५ हजार ७५२ रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती मंदिर समितीतर्फे देण्यात आली.
    Chhagan Bhujbal: कुणाचे तरी काढून मला मंत्रिपद नको! छगन भुजबळ मंत्रिपदाबाबत स्पष्टच बोलले
    मंदिर समितीला वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत आहे. मिळालेल्या दानामधून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार आहे. – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed