Navi Mumbai Crime News: कामोठ्यातील एका घरात एका आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या दोघांची हत्या कोणी केली याचा अवघ्या २४ तासात पोलिसांनी छडा लावला आहे.
कामोठे पोलिसांनी प्रथम अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या घटनास्थळी परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रशांत मोहिते, पनवेल विभागचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक राजपूत, पनवेल गुन्हे विभागाचे अजयकुमार लांडगे यांनी भेट दिली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पनवेल विभाग यांचे पर्यवेक्षणाखाली ४ व सपोआ, गुन्हे शाखा यांचे पर्यवेक्षणाखाली गुन्हे शाखा, कक्ष २, गुन्हे शाखा, कश्व ३ कडील विविध तपास पथके तयार करणेत आली होती. या पथकाने संज्योत मंगेश दोडके ( वय १९ वर्ष), शुभम महिंद्र नारायणी (वय १९ वर्ष) यांना उलवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले
जितेंद्र जग्गी आणि त्यांची वृद्ध आई गीता जग्गी यांचे मृतदेह कामोठे पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर लागलीच तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता अवघ्या २४ तासांच्या आत या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात आला असून प्रत्यक्षात या प्रकरणाला अत्यंत विचित्र वळण लागले आहे.
याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून संज्योट दोडके आणि शुभम नारायणी अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबानुसार मृत जितेंद्र हा त्यांचा दीड वर्षांपासून जिवलग मित्र होता. थर्टी फर्स्टच्या रात्री दारू प्यायल्यानंतर जितेंद्र आपला मित्र शुभम आणि संज्योत यांच्याकडे समलिंगी संबंधासाठी आग्रह करत होता. या आग्रहाला बळी न पडता आणि वासनेचे शिकार होऊ नये म्हणून शुभम नारायणी याने एक्सटेंशन बोर्डने मयताचे डोक्यात मारुन जीवे ठार मारले. तर, संज्योत दोडके याने मयताचे आई गीता जग्गी यांचा गळा आवळून ठार मारले. तसेच, जाताना मयताचे मोबाईल फोन, पाकीट, टॅब आणि काही दागिने चोरून नेले.
खून झाल्याचे कोणाला समजू नये यासाठी आरोपींनी जाताना गॅस सिलेंडरचे सर्व कनेक्शन ऑन केले आणि गॅस लिक झाल्याचा बनाव केला. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सदर गुन्हयाचे तपासात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे या करीत आहेत.