Nandurbar Crime News : नंदुरबारमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच आईने जुळ्यांना संपवलं, नंतर स्वत:च्या आयुष्याचीही दोर कापली; मुलांच्या हत्येमागचं कारण संतापजनक
काय आहे नेमकं प्रकरण?
नंदुरबार शहरातील कोकणी हिल परिसरातील देवमोगरा कॉलनीमध्ये रवींद्र शिवदास येलवे (३९) राहत होते. त्यांनी अवैध सावकारांकडून उसनवार रक्कम घेतली होती. हे पैसे ताबडतोब मिळावे यासाठी फोनवरून तसंच प्रत्यक्ष घरी जाऊन अवैध सावकार तगादा लावत होता. त्या त्रासाला कंटाळून ३१ डिसेंबर २०२४ रोजी राहत्या घरी रवींद्र येलवे यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. येवले यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रात्रीची वेळ, धावत्या एक्सप्रेसमध्ये सुरू होता खुनी खेळ, सकाळी प्रवासी हादरले; मध्यरात्री काय घडलं?
रवींद्र येलवे यांच्या निधनानंतर कुटुंब शोकसागरात बुडलं आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कविताबाई रविंद्र येलवे यांच्या फिर्यादीवरून सचिन चौधरी, दीपक चौधरी आणि आकाश सोनवणे या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे अधिक तपास करत आहेत.
३१ डिसेंबरच्या रात्री डिजेच्या गाण्यावरुन वाद, भांडण टोकाला गेलं आणि नको ते घडलं; मिरा-भाईंदरमधील भयंकर घटना
अवैध सावकाराचा पैशांसाठी तगादा, त्रासाला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
जिल्ह्याभरात अवैध सावकारांचा सुळसुळाट
सर्वत्र नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले होते. न्यू ईयरच्या स्वागताचा सगळीकडे उत्साह असताना वर्षाच्या अखेरीस ३१ डिसेंबर रोजी येलवे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रवींद्र येलवे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे. रवींद्र येलवे हे नंदुरबार येथील राज्य परिवहन विभागात वाहक या पदावर कार्यरत होते. त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अवैध सावकारांच्या सुळसुळाट असून याकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं, असल्याची मागणी होत आहे.