Prakash Ambedkar Reaction On Santosh Deshmukh Murder: बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने आता संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता प्रकाश आंबेडकर यांनीही फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झालेलं – प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आधी पोलिसांनी चैकशी केली, मग अधिक्षकांनी पण त्यांना काही सापडलं नाही. मग, सीआयडीने चौकशी केली त्यांनाही काही सापडलं नाही, आता एसआयटी स्थापन केली, पुढे ही केस काय सीबीआयला देणार का, असा प्रश्न आंबेडकरांनी केला आहे. तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, असंही ते फडणवीसांना उद्देशून म्हणाले.
नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर संताप व्यक्त केला आहे.
पाहा प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट
देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्य प्रकरणी पहिल्यांदा स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. त्यांना देशमुख हत्येप्रकरणी काही सापडले नाही. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी चौकशी केली, त्यांना काही सापडले नाही. त्यानंतर CID ने चौकशी केली, त्यांनाही काही सापडले नाही आणि आता चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे.
पुढे काय करणार? तर ही केस CBI ला देणार !
देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही.
ज्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही ? याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा.