• Tue. Jan 7th, 2025

    कालव्यात उड्या मारून पती पत्नीने संपवले आयुष्य, अखेर का घेतला टोकाचा निर्णय, मोठी खळबळ

    कालव्यात उड्या मारून पती पत्नीने संपवले आयुष्य, अखेर का घेतला टोकाचा निर्णय, मोठी खळबळ

    Edited byशितल मुंढे | Contributed by प्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Jan 2025, 11:42 am

    Pune News : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथे पती पत्नीने डिंभे कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. चिराग आणि पल्लवी शेळके असे त्यांचे नाव असून त्यांचे मृतदेह आढळले आहेत. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रशांत श्रीमंदिलकर पुणे : जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत डिंभे कालव्याच्या वाहत्या पाण्यात पती पत्नीने उडी मारून आत्महत्या केल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28) आणि त्याची पत्नी पल्लवी चिराग शेळके (वय 25) अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव असून दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारस ही घटना घडली.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नव वर्षांच्या पहिल्याच दिवशी वारुळवाडी येथे राहत असलेले चिराग शेळके व त्याची पत्नी पल्लवी शेळके हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास नारायणगाव परिसरातील वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात फिरण्यासाठी आपल्या गाडीवरून आले होते. त्यावेळी डिंभे कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडला होता. त्या दोघांनी आपली गाडी कालव्याच्या बाजूला लावली आणि त्यानंतर वाहत्या पाण्यात उड्या मारल्या.
    Pune Crime: प्लॉटिंगवर लघुशंका केल्याने हटकलं, वॉचमनला दगडाने मारहाण, गोळीबारात महिलेचा मृत्यू; पुण्यात खळबळहैराण करणारे म्हणजे दोघांना कालव्यात उड्या मारताना काही लोकांनी बघितले देखील. कालव्यात पाण्याचा विसर्ग जास्त होता. धक्कादायक म्हणजे चिराग आणि पल्लवी यांचे नुकतेच आठ महिन्यापूर्वीच लग्न झालेले होते. ते दोघे पुण्यात कामाला होते. मात्र, कामानिमित्त ते गावी आले होते. त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघांनी आत्महत्या नेमकी का केली, याचा शोध घेतला जातोय. याप्रकरणी पोलिस हे पुढील तपास करत आहेत. दोघांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे.

    बुधवारी सायंकाळी आत्महत्या केलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह रात्री सापडला तर दुसरा मृतदेह पहाटेच्या सुमारास सापडला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांनातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता त्यांच्या आत्महत्येचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. दोघांनी आत्महत्येसारखे इतके मोठे पाऊल का उचलले याचा शोध हा घेतला जातोय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed