२५ जानेवारीला ताकदीने अंतरवाली सराटीत या असे आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे. नांदेडमधील लोहा येथे आयोजित मराठा आरक्षण संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही थेट आव्हान दिले आहे. मराठ्यांविषयी द्वेष नसेल तर आरक्षण द्या, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही असे जरांगे म्हणाले. आरक्षण दिलं नाही तर सरकारचा कार्यक्रमच करतो असं विधानही जरांगेंनी केलंय.