Santosh Deshmukh Murder Case SIT Appointed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आता सरकारने महत्वाचं उचलत या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली आहे.
बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. याप्रकणाचा सध्या सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. तर आतापर्यंत याप्रकरणात मोठ्या घडामोडी घडलया आहेत. हत्येचा मास्टरमाईंड म्हणून ज्या वाल्मिक कराडांचे नाव समोर त्यांनी काल पोिसांसमोर येत आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला केज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर आता सरकारने महत्वाचं उचलत या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली आहे. या समितीत ९ पोलीस अधिकारी आहेत. तर आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा