Bacchu Kadu Resign: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला हा राजीनामा पाठविला आहे.
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नसल्यावरून संतप्त माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला हा राजीनामा पाठविला आहे.
आईचा खून करुन टीव्ही बघत बसला, वडील आले अन् त्यांनाही…; नागपूर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
बच्चू कडू यांनी आपल्या राजीनाम्यात देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय राज्यात निर्माण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. सोबतच दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नसल्याकडेही लक्ष वेधले. या विभागाच्या अध्यक्षपदावर राहताना कामे होण्याची शक्यता दिसून येत नाही. दिव्यांगासोबत बेईमानी करणे शक्य नसल्याने आपण दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सदर राजीनामा मंजूर करून सहकार्य करावे, मला असलेली सुरक्षासुद्धा काढून टाकावी व कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये, असेही पत्रात म्हटले आहे.
Chhagan Bhujbal: कुणाचे तरी काढून मला मंत्रिपद नको! छगन भुजबळ मंत्रिपदाबाबत स्पष्टच बोलले
बच्चू कडू यांची २४ मे २०२३ रोजी दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र त्यांनी सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. आपण दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष उरलो आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात तेसुद्धा मला कळवले जात नाही, अशी खंतही बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती.