Walmik Karad: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला.
मागील २२ दिवसांपासून तपास यंत्रणांना गुंगारा देणारा वाल्मिक कराड आज दुपारी साडे बाराच्या सुमारास पोलिसांसमोर हजर झाला. एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्यानं पुण्यातील सीआयडीचं मुख्यालय गाठलं. यावेळी त्याच्यासोबत परळीतील दोन नगरसेवक होते. कराडला माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला, त्यावेळी नगरसेवक कराडच्या सोबतच होते. त्यातील एकानं कराडच्या ठावठिकाणाबद्दल वेगळाच दावा केला आहे.
Walmik Karad: आधी पोलीस, मग CID मागावर; २२ दिवस कुठे होता कराड? देशमुखांच्या खुनानंतर ठावठिकाणा कसा बदलला?
वाल्मिक अण्णा सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचं काम उत्तम सुरु आहे. पण ते काहींना बघवत नाहीए, असा दावा नगरसेवकानं माध्यमांशी बोलताना केला. ‘धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे दोघेही मंत्री झाले. ते काहींना रुचलेलं नाही. त्यामुळे वाल्मिक अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. यात बीड जिल्ह्यातीलच आमदारांचाच सहभाग आहे. त्यांच्या विरोधात पुरावे असतील तर आम्ही मान्य करु. पण त्यांच्या विरोधात पुरावेच नाहीत. गुन्हा घडला त्यावेळी ते इकडे नव्हतेच. तेव्हा तर वाल्मिक अण्णा उज्जैनला होता,’ असा दावा नगरसेवकानं केला.
Walmik Karad Surrender: वाल्मिक अण्णा दैवत! कार्यकर्ता तावातावानं बोलला अन् सोबतच्यांनी दूर नेलं; पळवत पळवत कानफटवलं
वाल्मिक कराड गेल्या २२ दिवसांपासून कुठे होता, आत्मसमर्पण करण्याआधी त्याचं शेवटचं लोकेशन काय होतं, याबद्दल त्याच्या समर्थकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. सीआयडीसमोर शरणागती पत्करण्यापूर्वी कराड अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला होता, असा दावा एकानं केला. त्याआधी इतके दिवस तो कुठे होता, याची माहिती आपल्याला नाही, असा दावा त्यानं केला. तर दुसऱ्या एका नगरसेवकानं गेल्या तीन दिवसांपासून वाल्मिक अण्णा पुण्यातच होते, असा दावा केला.