Uddhav Thackeray Workers Left Party: पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. उबाठाचे अनेक कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: माजी आमदाराचाही पक्ष सोडण्याचा निर्णय.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही मदत मिळत नासल्यासामुळे नेते आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करत आहेत. त्यामुळे पुण्यातून शिवसेना उबाठाला मोठा धक्का बसणार असं चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यरत असलेले आक्रमक नेते सुरज लोखंडे यांनी प्रसार माध्यमांमध्ये जाहीर केलेला संदेश हा सगळीकडे पसरला आहे. नवीन वर्ष संपण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे पुण्यातले पाच नगरसेवक जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
येत्या ५ जानेवारीला मुंबई येथे ठाकरेंचे ५ माजी नगरसेवक ज्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह ४ नगरसेवक हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजप पक्षात येथे प्रवेश करणार आहेत. मुंबईत ते भाजपमध्ये प्रवेश घेतील. त्यामुळे पुण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे. या संदर्भातला एक मेसेज व्हॉट्सअॅपवर शेअर होतो आहे.
उद्धवसाहेब,
जय महाराष्ट्र
पुण्यातील शिवसेना का होणार उध्वस्त…. कित्येक नगरसेवक जाणार दुसऱ्या पक्षात… मुंबईकडे लक्ष देता देता पुण्यातील शिवसेनेकडे झाले दुर्लक्ष…. शिवसेना फुटली… लाटा आल्या.. आघाड्या झाल्या.. युत्या झाल्या… वेगळे लढलो… अनेक आमदार खासदार गेले……….. तरी कधी पुण्यातील शिवसैनिक डगमगला नाही. पण, काही दिवसांत पुण्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा भूकंप होणार आणि अनेक निष्ठावंत शिवसैनिक दुसऱ्या पक्षात जाणार…
जय महाराष्ट्र
आपला शिवसैनिक सूरज लोखंडे
सूरज लोखंडे यांच्या नावे असा मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर शेअर होतो आहे. आता उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी काही करतात हा हे पाहावं लागणार आहे.