Mumbai News : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून अवघ्या २० ते २५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम सध्या सुरू आहे.
प्रवास होणार झटपट
“जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून मुलुंड, ठाणे येथे जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो. मात्र गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांत होऊ शकतो. परंतु सध्या, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत दुहेरी बोगदा बांधणे अत्यंत आव्हानात्मक आहे. यासाठीच कामाचा दर्जा आणि प्रकाश व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी तसेच इतरही तांत्रिक मदतीसाठी व्हीजेटीआयची मदत घेतली जात आहे. ट्विन टनेलच्या बांधकामात थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा हा निर्णय कोस्टल रोडच्या बांधकामात सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन घेण्यात आला आहे” असे अधिकाऱ्याने सांगितले.
खर्च वाढणार?
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीत बोगदा खोदण्यासाठी टनेल बोरिंग मशीन चीनमधून मुंबईत आणण्यात येणार आहे. मार्च २०२५ पूर्वी मशीन आल्यानंतर बोगद्याचे काम सुरू होईल. दुहेरी बोगद्याच्या बांधकामादरम्यान थर्ड पार्टी ऑडिटगुणवत्तेच्या दृष्टीने केले जाईल. परंतु या ऑडिटच्या कामामुळे खर्च वाढेल. सध्या दुहेरी बोगद्याचा निर्मिती खर्चाची किंमत ६३०० कोटी रुपये आहे, मात्र थर्ड पार्टी ऑडिटनंतर हा खर्च ६५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत या दुहेरी बोगद्याच्या बांधकामासोबतच फिल्मसिटीजवळ १.६ किमी लांबीचा बोगदाही बांधण्यात येणार आहे.